Dog Attack in Mumbai: 12 वर्षीय मुलावर German Shepherd कुत्र्याचा हल्ला, हात, कंबरेवर चावा; कुटुंबियांनी दाखल केली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार

पीडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी नव्हती त्यामुळे त्याचा मालक कुत्र्याला मागे खेचू शकला नाही.

German Shepherd Dog | pixabay.coom

मुंबई मध्ये 12 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. German Shepherd कुत्र्याने हा हल्ला केला आहे. ही घटना घाटकोपर मधील बुधवार 25 डिसेंबरची आहे. हा मुलगा आपल्या मित्रांसोबत जवळच्या पार्क मध्ये जात असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आहे. पीडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी नव्हती त्यामुळे त्याचा मालक कुत्र्याला मागे खेचू शकला नाही. Hindustan Times च्या वृत्तानुसार, पीडीत मुलाचे वडील 47 वर्षीय अमोल बाबासाहेब कीर्ते आहेत. ते माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर ईस्टचे रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा घराजवळ असलेल्या पालिकेच्या गार्डन मध्ये जात असताना झाला आहे.

मुलाच्या हातावर चावा

तक्रारीमधील माहितीनुसार, कुत्रा, अचानक त्या मुलांकडे धावला आणि त्याने चावा घेतला. कुत्र्याने मुलाला त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर व कमरेला चावा घेतल्याचे समजते. घटना पाहणाऱ्या लोकांनी तात्काळ त्याच्या वडिलांना हल्ल्याची माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या मुलाला राजावाडी रुग्णालयात नेले.

दरम्यान, मालकाने त्याच्या पाळीव कुत्र्याला सेफ्टी लीश शिवाय घरी नेले. उपचारानंतर अल्पवयीन मुलाला रुग्णालयातून सोडण्यात आले. यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात जाऊन कुत्र्याचा मालक अब्दुल करीम प्रधान याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पंत नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, त्यांनी प्रधान यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

"त्याने बीएमसीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून कुत्र्याचा परवाना घेतला होता का आणि तो कुत्र्यांच्या मालकीबाबत बीएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत होता की नाही याची आम्ही पडताळणी करत आहोत," असे उपनिरीक्षक गायकवाड यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement