10 वर्ष तरूणी खात होती स्वतःचेच केस, जे जे हॉस्पिटल्स मध्ये 22 वर्षीय तरूणीच्या पोटातून काढला 770 ग्रॅम केसांचा बोळा
यामध्ये रूग्णाला स्वतःचे केस खाण्याची सवय असते.
मुंबईच्या जे जे हॉस्पिटल्समध्ये (J J Hospital) डॉक्टरांनी लेप्रोसपिक शस्त्रक्रियेच्या मदतीने एका 22 वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क 770 ग्रॅम वजनाचा केसांचा बोळा काढला आहे. काही दिवसांपासून या मुलीना वेदना आणि अस्वस्थता जाणवत असल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये त्यांना सुरूवातीला हा गोळा पोटातीलचा एक भाग असल्याचं वाटलं परंतू नीट तपासणीनंतर हा चक्क केसांचा बोळा असल्याचं उलगडलं.
लॅप्रोसॅपिक सर्जरीच्या (Laparoscopy) मदतीने पोटाजवळ तीन कट्सच्या द्वारा हा बोळा बाहेर काढला गेला. या बोळ्यामुळे पोटामध्ये अल्सर झाले होते मात्र सुदैवाने त्याच्यामुळे गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले नव्हते. ही रूग्ण एका मनोविकाराची बळी होती. Rapunzel syndrome ने ग्रस्त असलेली ही मुलगी Trichopagia या आजारात होती. यामध्ये रूग्णाला स्वतःचे केस खाण्याची सवय असते.
अनेक वर्षांपर्यंत त्या मुलीच्या कुटुंबातील व्य्क्तींना ती केस खात असल्याच्या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. काही दिवसांपूर्वी तिच्या भावंडांनी केसाची बट खाताना तिला पाहिलं. मनोरूग्ण मुलीला या प्रकारामुळे खूप प्रमणात त्रास जाणवू लागल्यानंतर पालकांनी वैद्यकीय मदत घेतली. काहीही खाल्लं किंवा प्यायल्यानंतर तिला उलटीचा त्रास होता. सुमारे 10-15 दिवस ही मनोरूग्ण मुलगी काहीही न खाता राहिली. जेजे रूग्णालयात एन्डोस्कॉपीच्या मदतीने हा त्रास समजला. त्यानंतर ओपन सर्जरी टाळून त्यांनी लेप्रोस्कॉपी करण्याचं ठरवलं यामुळे रिकव्हरी होण्यासाठी अधिक काळ लागत नाही. तसेच या मुलीवर पुढील उपचार मानोपसचार डॉक्टरांकडून दिले जाणार आहेत.