Doctor Wife Dies by Suicide: पतीच्या जाचाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर पत्नीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अत्याचारांचा खुलासा
उच्च शिक्षीत प्रतीक्षा गवारे या महिलेचे काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होत. मात्र पतीकडून चारित्र्यावर होणाऱअया संशयांमुळे आणि पैशाच्या लोभामुळे तिने आत्महत्या केली. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
Doctor Wife Dies by Suicide: राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजही अनेक महिला लग्नानंतर पती किंवा सासरच्या जाचाला बळी पडत आहेत. बदलापूरची घटना ताजी असतानच छत्रपती संभाजीनगरमधील( Chhatrapati Sambhajinagar) महिला डॉक्टरने पतीच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं (Dies)आहे. प्रतीक्षा गवारे असं आत्महत्या केलेल्या या महिला डॉक्टरचं नाव (Doctor Wife Commits Suicide)आहे. तिने पतीच्या नावे सात पानी पत्र लिहून आत्महत्या केली. या घटनेची छत्रपती संभाजी नगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार प्रतिक्षाच्या वडिलांनी सीडको पोलीस ठाण्यात नोंदवली.(Noida Suicide Case: 'बॉडीशेमिंग' असहय्य झाल्याने बॅंकेत Executive पदावरील महिलेने विष पिऊन संपवलं आयुष्य; सुसाईड नोट मध्ये सहकर्मचार्यांवर छळाचा आरोप)
प्रीतम गवारे असे आरोपी पतीचे नाव आहे, तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याशिवय, हुंडा मिळावा आणि घरात फर्निचर मिळावं म्हणून प्रीतमने पत्नीकडे तगादा लावला होता. पतीच्या या जाचाला कंटाळून प्रतीक्षाने आयुष्य संपवलं. धक्कादायक म्हणजे प्रतीक्षाच्या आत्महत्येनंतर प्रीतम फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (MBA Student Dies By Suicide: मालाडमध्ये 22 वर्षीय एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या; शैक्षणिक दबावामुळे सातव्या मजल्यावरून मारली उडी)
प्रतीक्षाने पत्रात म्हटले की, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरले. मात्र, हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी केली. नोकरी सोडली. तुम्ही सांगितलं म्हणून सोडलं मी. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलण कमी केलं. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय ( Doctor Suicide ) घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा म्हटला. फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तो आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिला म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.
अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)