Diwali 2022 Muhurat Trading Date and Timings: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग साठी यंदा पहा बाजार कधी, किती वाजता खुला होणार?

यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 6.15 ते 7.15 या तासभरात होणार आहे.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

दिवाळी (Diwali) मध्ये लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात ट्रेडिंग सेशन करण्याची पद्धत आहे. यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 6.15 ते 7.15 या तासभरात होणार आहे. दिवाळी दिवशी सुट्टी असली तरीही एका तासासाठी शेअर मार्केट खास ट्रेडिंगसाठी सुरू ठेवले जाते. या तासाभरात 'मुहूर्त ट्रेडिंग' केले जाते. हे देखील नक्की वाचा: Laxmi Pujan 2022 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी .

मुहूर्त ट्रेडिंगचं वैशिष्ट्यं काय?

दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी संवत वर्षाची सुरूवात असल्याने हिंदू धर्मीय नव्या वर्षाची सुरूवात खास गुंतवणूक करून करतात. या सणाच्या दिवशी संपूर्ण दिवस मार्केट बंद असते पण केवळ तासभरासाठी ते खुलं ठेवलं जातं. या खास ट्रेडिंग द्वारा लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच्या मते, लक्ष्मी माता ही धन संपत्तीची, सौभाग्याची देवता आहे.

मुहूर्त ट्रेडिंग द्वारा संवत वर्ष 2079 ची सुरूवात होणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून नव्या व्यवहारांची सुरूवात केली जाते.

मुहूर्त ट्रेडिंग महत्त्वाच्या वेळा

मुहूर्त ट्रेडिंग साठी प्री ओपन सेशन संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 6.08 वाजता संपणार आहे. 6.15 ते 7.15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. तर ट्रेड मॉडिफिकेशन संध्याकाळी 7.25 पर्यंत असणार आहे.

ट्रेडिंगमध्ये काही मदत हवी असल्यास तुम्ही BSE Helpdesk वर 022-45720400/600 या क्रमांकावर मदत मागू सहकाल तर bsehelp@bseindia.com वर मदतही मागू शकाल.