कल्याण: वरबापाने केली वरमाईची हत्या, नववधू कन्येवरही चाकूचे वार; विवाहाच्या आगोदर राडा
मात्र, या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून काही तासांतच आरोपी मोहन याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर कल्याण शहरात खळबळ तर उडाली आहेच. परंतू, परिसरात घबराटीचेही वातावरण निर्माण झाले आहे.
Dispute Between Husband And Wife: कन्येच्या लग्नाला काही दिवसांचाच अवकाश असताना वरबापाने वरमाई असलेल्या आपल्या पत्नीलाच भोसकल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) येथे ही घटना घडली. केवळ लग्नपत्रिकेवर (Wedding Card) नाव टाकण्यातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला आणि ही घटना घडल्याचे समजते. वरबापाने केलेल्या हल्लायत मुलगीही गंभीर जखमी झाली. ही मुलगीच वधू होती. येत्या काही काळात तिचा विवाह होणार होता.
दरम्यान, घटनेची माहती मिळताच पोलिसांनी काही तासांतच आरोपी वरबापाला बेड्या ठोकल्या. मोहन महाजन असे पत्नीची (वरमाई) हत्या करणाऱ्या पतीचे (वरबाप) नाव आहे. तर, मनीषा महाजन असे मोहनच्या पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मोहन आणि त्याची पत्नी मनीषा यांच्या गेले बराच काळ वाद होता. या वादातून मोन पत्नी, मुलांपासून विभक्त राहात होता. मात्र, मुलीचे लग्न असल्याने काही काळासाठी तो पत्नी, मुलीसोबत राहण्यास आला होता.
दरम्यान, मुलीच्या लग्नात लग्नपत्रिकेवर टाकण्यात आलेल्या नावांवरुन मोहन आणि मनीशा यांच्यात गुरुवारी रात्री मानापमान नाट्य सूरु झाले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने पत्नीला भोसकले. यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आई-वडीलांची भांडणं सोडविण्यासाठी आणि आईला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलीवरही मोहन याने हल्ला केला. मोहन याने मुलीवर चाकुचे सहा वार केले. (हेही वाचा, अहमदनगर: आंतरजातीय मुलासोबत लग्न केल्याने आई-वडिलांनीच केली पोटच्या मुलीची हत्या)
हल्ला केल्यानंतर मोहन याने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून काही तासांतच आरोपी मोहन याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर कल्याण शहरात खळबळ तर उडाली आहेच. परंतू, परिसरात घबराटीचेही वातावरण निर्माण झाले आहे.