Anil Deshmukh Money Laundering Case: Sachin Waze माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार; CBI कोर्टाने स्वीकरला अर्ज
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सचिन वाझे हा सहआरोपी आहे.
मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला आहे. त्याने सीबीआय स्पेशल कोर्टामध्ये त्याबाबतचा अर्ज दाखल आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह इतर आरोपींविरूद्ध सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला आहे. दरम्यान सीबीआय कोर्टाने देखील काही अटी शर्तींसह सचिन वाझेच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 30 मे दिवशी होणार आहे.
सीबीआय कोर्टाने जर सचिन वाझेंची याचिका स्वीकारली तर त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाणार आणि पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही. त्यामुळे मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये हे मोठं वळण ठरण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सचिन वाझे हा सहआरोपी आहे. नक्की वाचा: Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन बारमधून पैसे उकळले, सचिन वाझे याची चांदिवाल आयोगाला महिती.
ANI Tweet
सचिन वाझे याची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी त्याच्यावर दोन वेळा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या मुंबईत सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी देखील सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहे. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री अनिल देश्मुख यांनी मुंबईत बार मधून वसूली करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप तात्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला होता. अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर करत आणि कनिष्ठ पोलिस कर्मचार्यांना हाताशी धरून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसूल करून 4 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम जमवली आणि नागपूर मध्ये असलेल्या त्यांच्या शिक्षणसंस्थेत वळवल्याच्या आरोपाखाली ईडीने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.