Disha Salian Death Case: दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्या; बलात्कार, खूनाचे आरोप पोलिसांनी फेटाळले
दिशाचा मृतदेह सापडला तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याची माहिती नगरकर यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, 9 जून 2020 दिवशी सब इन्स्पेक्टर देवडे यांना शताब्दी हॉस्पिटल मधून मेसेज आला. यामध्ये 28 वर्षीय दिशाचा खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
Disha Salian वर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून झाल्याचा दावा पोलिसांनी नाकारला आहे. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत असताना पोलिसांनी हीच भूमिका कायम ठेवली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्येही ते त्याच भूमिकेवर ठाम आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या criminal writ petition मध्ये बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी चौकशी सीबीआयकडे देण्याची आणि कथित गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या SIT विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
दिशाचा मृतदेह सापडला तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याची माहिती नगरकर यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, 9 जून 2020 दिवशी सब इन्स्पेक्टर देवडे यांना शताब्दी हॉस्पिटल मधून मेसेज आला. यामध्ये 28 वर्षीय दिशाचा खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. दिशा 12व्या मजल्याच्या खिडकीतून पडली होती. Regent Galaxy building मध्ये 1201 रूम मधून पडून तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री दीड च्या सुमाराची असून तिचा मृत्यू 2.25 च्या सुमारास जाहीर करण्यात आला होता. उपचारांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला होता. असं Free Press Journal च्या माहितीमध्ये देण्यात आले आहे.
अपघाती मृत्यू अहवाल (ADR) क्रमांक 85/2020 नोंदवण्यात आला आणि CRPC च्या कलम 174 अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. कोविड - 19 नियमांनुसार, 9 जून 2020 रोजी मृताचा कोविड स्वॅब घेण्यात आला आणि निगेटिव्ह रिपोर्ट (RTPCR) मिळाल्यानंतर 11 जून रोजी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात पोस्ट मार्टम करण्यात आले. मालवणी स्मशानभूमीत त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये कोणालाही गैरप्रकाराचा संशय नव्हता.
नगरकर म्हणाले की दिशा जाहिरात क्षेत्रात काम करत होती आणि 2017 पासून रोहन रॉयवर प्रेम करत होती.2017 मध्ये त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांनी लग्न केले. दरम्यान, तिने रोहनची ओळख तिच्या बालपणीच्या मित्रांशी, इंद्रनील, दीप, हिमांशू, रेशा आणि अंकिता यांच्याशी करून दिली आणि ते अनेकदा भेटत असत. मृत्यू पूर्वी दिशाने मद्यपान
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)