Rakesh Pal Appointed As DG Of Indian Coast Guard: महासंचालक राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे DG म्हणून नियुक्ती
त्यांनी इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, कोची येथे तोफखाना आणि शस्त्रे प्रणालीमध्ये व्यावसायिक विशेषीकरण केले असून युनायटेड किंगडममधून इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्स केला आहे.
Rakesh Pal Appointed As DG Of Indian Coast Guard: महासंचालक राकेश पाल (Rakesh Pal) यांची भारतीय तटरक्षक दलाचे (Of Indian Coast Guard) 25 वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. पाल हे जानेवारी 1989 मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. त्यांनी इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, कोची येथे तोफखाना आणि शस्त्रे प्रणालीमध्ये व्यावसायिक विशेषीकरण केले असून युनायटेड किंगडममधून इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्स केला आहे.
पाल यांनी आपल्या कार्यकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. पाल यांच्याकडे समुद्राचा प्रचंड अनुभव आहे आणि त्यांनी सर्व श्रेणीच्या ICG जहाजांची कमांड केली आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर पदोन्नती देण्यात आली होती आणि कोस्ट गार्ड मुख्यालय, नवी दिल्ली येथे अतिरिक्त महासंचालक तटरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यांना फेब्रुवारी 2023 पासून महासंचालक तटरक्षक दलाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता. (हेही वाचा - Tulsi Dam Overflow: तुळशी डॅम ओव्हरफ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला)
त्यांच्या सर्वोच्च देखरेखीखालील अनेक प्रमुख ऑपरेशन्स आणि सराव यशस्वीरीत्या पार पडले ज्यामध्ये ड्रग्ज/अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करणे, नाविकांची सुटका करणे यांचा समावेश आहे. अतिशय तीव्र चक्रीवादळ, परदेशी तटरक्षक दलासह संयुक्त सराव, चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी मदत आणि तटीय सुरक्षा सराव यांचा समावेश आहे.
त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2013 मध्ये तत्ररक्षक पदक (TM) आणि वर्ष 2018 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तत्ररक्षक पदक (PTM) ने सन्मानित करण्यात आले आहे. पाल हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते एक उत्कट संगीत प्रेमी आणि एक उत्साही क्रीडा उत्साही आहे.