Maharashtra Assembly Election 2019: दीपाली सय्यदसोबत 'हे' सिनेकलाकार देखील लढवणार निवडणुक

चला तर जाणून घेऊया कोणते कलाकार विधानसभेच्या शर्यतीत लढा देणार आहेत.

Dipali Sayyed, Abhijit Bichukale (Photo: Facebook)

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही २88 जागांसाठी होणार असून एकूण 3239 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि शिवसेनेची युती सध्या गाजत आहे तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्रितपणे आपली विश्वासार्हता वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आपल्या पक्षाच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागात प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार देखील तितकीच तोडीसतोड टक्कर देताना दिसत आहे.

Exclusive: सेलिब्रिटी स्टेटसचा निवडणुकांमध्ये नक्कीच होईल फायदा, मुंब्रा- कळवा शिवसेना उमेदवार दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली भावना

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक सिनेकलाकार देखील आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते कलाकार विधानसभेच्या शर्यतीत लढा देणार आहेत.

दिपाली सय्यद

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपालीने नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला व आता ती मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड त्यांचा विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात असतील. तिने लेटेस्टली मराठी सोबतच्या मुलाखतीत कबूल केले होते की स्टारडमचा निवडणुकांमध्ये नक्कीच उपयोग होतो.

अभिजित बिचुकले

बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही लढताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमधील चर्चेचा विषय ठरलेले अभिजित बिचुकले हे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना आव्हान देणार आहेत. ते मुंबईच्या वरळी विभागातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.

एजाज खान

अभिनेते एजाज खान हे देखील बिग बॉस हिंदीचे स्पर्धक होते. एजाज हे या वेळी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. इजाज हे मुंबईतील भायखळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांचा सामना एमआयएमच्या वारस पठाण यांच्यासोबत असणार आहे.