Dhangar Reservation: धनगर आरक्षण मुद्दा तापला, गिरीष महाजन यांच्या शिष्टाई निष्फळ; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
चौंडी येथे पाठीमागील 11 दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मुद्द्यावर जोरदार आंदोलन सुरु आहे. यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपोषणास बसले आहे. या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी गेलेल्या मंत्री गिरीष महाजन यांची शिष्टाई असफल झाली आहे.
Dhangar Reservation Issue: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असतानाच आता धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. चौंडी येथे पाठीमागील 11 दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मुद्द्यावर जोरदार आंदोलन सुरु आहे. यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपोषणास बसले आहे. या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी गेलेल्या मंत्री गिरीष महाजन यांची शिष्टाई असफल झाली आहे. आंदोलक ठाम राहिल्याने आंदोलन सुरुच राहणार आहे. दुसऱ्या बाजूला उपोषणककर्त्यांची प्रकृतीही आता मोठ्या प्रमाणावर खालावल्याचे वृत्त आहे.
आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर आणि यशवंत सेनेचे इतर कारी कार्यकर्ते चौंडी येथे धनगर आरक्षण मुद्द्यावर उपोषणाला बसले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरहून नगरच्या दिशेने येताना चौंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा निष्फळ ठरली. प्रकृती खालावललेल्या उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचीही भेट महाजन यानी घेतली.
धनगर समाज हा 2014 पासून भाजपच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिला आहे. तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. धनगर बांधव चौंडी येथे पाठीमागील 11 दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्याची सरकारने म्हणवी तशी दखलही घेतली नाही. सरकार समाजाची एवढी कुचंबणा कार करते आहे, असा संतप्त सवालही धनगर समाज्याच्या आंदोलकांनी केला आहे. या वेळी गिरीश महाजन यांनी आंदोलक आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादघडवून आणला. या वेळी आम्हाला तुम्हास फसवायचे नाही. सविस्तर चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे फोनवरी चर्चेत फडणवीस यांनी सांगितले.