परळी: धनंजय मुंडे यांची भावनिकतेवर मात, पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव
धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते होते. तर, पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय वारसाही पंकजा मुंडे यांना मिळाला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही परळी येथे येऊन सभा घेतल्या होत्या.
Parli Assembly Constituency Election Results 2019: अत्यंत चुरशीच्या आणि निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचंड भावनिक ठरलेल्या परळी विधानसभा (Parli Assembly Constituency) मतदारसंघातून अत्यंत धक्कादायक निकाल आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा विजय तर भाजप उमेदवारपंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्याचे वृत्त आहे. धनंजय मुंडे हे 83,734 मते मिळवत आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे या 56,610 मतांवर अडखळल्या आहेत.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढत ही तशी पारंपरीक. त्यामुळे दोन्ही उमेदवारांंमध्ये नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. परंतू, या वेळची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते होते. तर, पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय वारसाही पंकजा मुंडे यांना मिळाला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही परळी येथे येऊन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक पंकजा मुंडे एकहाती लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच हा धक्कादायक निकाल येऊ पाहात आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या रणधुमाळीत परभणी मधून भाजपचे विजय फड यांचा पराभव)
महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवसाच्या दोन दिवस आगोदर या मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अत्यंत वाद निर्माण झाला होता. या व्हिडिओनंतर पंकजा मुंडे यांना आलेली कथीत भोवळ आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भावांनी आमच्या बहिण भावाच्या नात्यात विष कालवले. व्हिडिओ पाहून जगण्याचीच इच्छा राहिली नाही, असे काढलेले भावनिक उद्गार कमालीचे महत्त्वाचे ठरले. या पार्श्वभूमिवर परळीची जनता कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2019 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

