'मला जग सोडून जावे वाटतय; नव्या आलेल्या भावांनी नात्यात विष कालवले'–धनंजय मुंडे
यानंतर धनंजय मुंडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शनिवारी पंकजा मुंडे यांनी परळी येथे सभा घेतली होते. या प्रचारसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन खाली कोसळल्या होत्या. याला धनंजय मुंडेच जबाबदार आहेत, असा आरोप पंकजा मुंडे समर्थकांनी केला आहे.
भाजपच्या (BJP) उमेदवार आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल होते. यानंतर धनंजय मुंडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शनिवारी पंकजा मुंडे यांनी परळी येथे सभा घेतली होते. या प्रचारसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन खाली कोसळल्या होत्या. याला धनंजय मुंडेच जबाबदार आहेत, असा आरोप पंकजा मुंडे समर्थकांनी केला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी परळीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ही व्हिडिओ क्लिप एडिट करुन लोकांच्या समोर आणली गेली आहे. नव्या आलेल्या भावाने आमच्या नात्यात विष कालवले आहे. यामुळे मला जग सोडून जावे असे वाटत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे यांनी विडा येथे १७ तारखेला भाषण केले होते. दरम्यान त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबदल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धनंजय यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांनी रविवारी दुपारी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन त्या वक्तव्यावर भूमिका मांडली आहे. व त्यावेळी ते म्हणाले की, “माझ्या मागे कुणाचे नाव नव्हते, लोकांची कामे करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. स्वतःच्या कर्तृत्वाने नायक झालो, पण आता खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी कधीही कुणाचे मन दुखावेल असे बोललो नाही. मतांच राजकारण कधीच केले नाही. ज्या बहिणीसाठी मी हा मतदारसंघांचा त्याग केला होता. मी नाती कशी सांभाळतो हे जनतेला माहिती आहे. मात्र, नव्याने आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी ते बहिणीसाठी नाही, तर जनतेसाठी बोललो होतो. कालचा वाद वेदनादायी असून आता जग सोडून जावे असे वाटत आहे,” असे सांगतांना धनंजय मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हे देखील वाचा- परळी: वादग्रस्त क्लिप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 ,509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.