Dhananjay Munde Beats COVID 19: धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; ब्रीच कॅंडी रुग्णालयातुन डिस्चार्ज

मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Canady Hospital) रुग्णालयातून आज, 22 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे(Edited and archived images)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आता कोरोनावर (Coronavirus) यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Canady Hospital) रुग्णालयातून आज, 22 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मुंडे यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारनटाईन मध्ये ठेवण्यात येणार आहे हा अवधी पूर्ण होताच ते लगेचच कामात रुजू होतील. प्राप्त माहितीनुसार, धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, 12 जूनला मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 11 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते.

प्राप्त माहितीनुसार, धनंजय मुंडे हे बीडहून मुंबईत आले असता त्यांच्या सहकाऱ्यांमधील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. या सहकाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती तशीच मुंडेंच्या बाबतही कोरोनाचे लक्षण दिसले नव्हते. मात्र श्वसनाचा त्रास झाल्यावर सहकाऱ्यांसह धंनजय मुंडे यांची सुद्धा कोरोना चाचणी घेण्यात आली होती. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोविड-19 ची लागण झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

पहा ट्विट

दरम्यान, धनंजय मुंडे हे कोरोनामुक्त झालेले महाविकासआघाडी मधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोघांनीही कोरोनावर मात केल्यावर आता धंनजय मुंडे यांनी सुद्धा कोरोनाला हरवले आहे.