Dhamma Chakra Pravartan Diwas 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर-पुणे, नागपूर-सोलापूर विशेष गाड्यांची घोषणा; एक्सप्रेस ट्रेन्स किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबणार

धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 12780/12779 निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्रेन क्रमांक 22685/22686 यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian Railway | Photo Credits: commons.wikimedia

धर्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Diwas 2024) हा भारतीय बौद्धांचा प्रमुख सण आहे. जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी या दिवशी एकत्र येऊन हा सण साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात, त्यांच्या 5 लाखांहून अधिक अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. या दिवसाचे प्रतिक म्हणून, दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी मुख्यतः दीक्षाभूमी आणि आता संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आता ता दिवसाचे औचित्य साधत भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 12780/12779 निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्रेन क्रमांक 22685/22686 यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे-

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (14 ऑक्टोबर) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेने सोलापूर-नागपूर आणि नागपूर-पुणे दरम्यान जादा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

01029 सोलापूर-नागपूर विशेष गाडी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूरहून निघून, दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता नागपुरात पोहोचेल. (हेही वाचा: Dhamma Chakra Pravartan Diwas 2024: मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या तपशील)

ही गाडी कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी येथे थांबेल.

01030 नागपूर-पुणे स्पेशल 13 ऑक्टोबर रोजी नागपूरहून संध्याकाळी 4:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:20 वाजता पुण्यात पोहोचेल.

ही गाडी सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली डेक्कन, पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी आणि दौंड येथे थांबेल.