कोल्हापूरच्या अंबाबाईला जालन्याच्या अध्यातिम संस्थानकडून तब्बल 47 तोळ्याचा सोन्याचा मुकूट अर्पण!

देवीला येणार्‍या दागिन्यांची खातरजमा करूनच मग ते स्विकारले जातात.

Kolhapur | PC: Twitter

कोल्हापूरच्या (Kolhapur) महालक्ष्मीला (Mahalaxmi) एका भक्ताने सुमारे 24 लाख किंमतीचा 47 तोळ्यांचा मुकूट अर्पण केला आहे. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मीलाच्या दर्शनाला भक्तांची देशा-परदेशातून मोठी रीघ असते. अशांपैकीच एक जालना येथील अध्यामिल संस्थानकडून महालक्ष्मीला 470 ग्रामचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. शनिवारी तो देवीला परिधान देखील करण्यात आला होता.

जालच्या अध्यात्मिक संस्थानाचे पुजारी आणि काही पदाधिकारी शनिवारी मुकूट घेऊन अंबाबाईच्या मंदिरात आले होते. त्यानंतर त्यांनी तो देवस्थानकडे दिला. देवीच्या पायी ठेवून प्रथम त्याचं पूजन करण्यात आले. त्यानंतर समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला. यापूर्वी जालन्यातून एका भक्ताने दीड कोटी रूपयाचे दागिने दिले होते.  कोलकाता येथील एका भक्ताने 32 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट दिला होता. त्यानंतर आता हा 24 लाख किंमतीचा अजून एक मुकुट देवीच्या चरणी आला आहे. नक्की वाचा:  Pratap Sarnaik यांनी कुटुंबासह तुळजाभवानी ला 75 तोळे सोनं दान करून फेडला नवस! 

देवीला यापूर्वी देखील अनेक भाविकांनी अशाप्रकारे आपल्या परिस्थितीनुसार मुकूट अर्पण केले आहेत. देवीच्या खजिन्यात निजामकालीन तसेच संस्थानकालीन अनेक दागिन्यांसह देवीच्या नित्यालंकारांचा समावेश आहे. देवीला येणार्‍या दागिन्यांची खातरजमा करूनच मग ते स्विकारले जातात. काही जण नवस फेडताना देखील अशा पद्धतीचे दाग-दागिने अर्पण करतात.