IPL Auction 2025 Live

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्यात सध्या पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याअभावी शेतकरी (Farmers) सध्या चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात आता पुन्हा पावसाने हजेरी न लावल्यास पाण्याअभावी अनेक पिंकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे.  मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना देण्यासाठी विहीरीचे पाणी आहे, ते शेतकरी पिकं जगवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशातच महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नाही. याप्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दखल घेतली आहे.  (हेही वाचा  - CM Eknath Shinde यांचे पोस्टर झळकले INDIA alliance meeting सभास्थळीच्या परिसरात )

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन, अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकार्‍यांना खडे बोल सुनाववे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन असा सज्जड इशारा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला. या घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांना सांगितली.