Sanjay Raut on Devendra Fadnavis: चाळीस खोके अंगावर पडल्याने देवेंद्र फडणवीस दबावात- संजय राऊत
चाळीस खोके अंगावर पडल्याने ते चिरडले गेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार दबाव आहे. अशा वेळी मला मिळालेल्या धमक्यांबाबत आपण त्यांना भेटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. चाळीस खोके अंगावर पडल्याने ते चिरडले गेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार दबाव आहे. अशा वेळी मला मिळालेल्या धमक्यांबाबत आपण त्यांना भेटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज्याचे पोलीस 'सामना' कार्यालयात बेकायदेशीरित्या घुसले. तिथे जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, असा आरोपही राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी म्हटले की, पोलीस मला भेटायला येणार होते. मी पोलिसांना सांगितले होते की, मी नाशिकमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही इतक्यात येऊ नका. मी आलो की तुम्हाला कळवतो. पण, असे सांगूनही पोलिसांनी ते ऐकले नाही. पोलीस कार्यालयात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. पोलिसांकडून जबरदस्तीने कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. इतकेच नव्हे तर ही कागदपत्रे आगोदरच तयार करण्यात आली होती, असेही राऊत यांनी म्हटले. आपण या सर्व प्रकाराबाबत आपण पोलीस आयुक्तांना पत्र लिहीणार असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Sanjay Raut: संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची चौकशी करु- एकनाथ शिंदे)
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, आपण आपल्याला आलेल्या धमकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देण्यात आली होती. यासोबतच आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते सध्या कोणत्या पदावर आहेत आणि ते काय बोलले आहेत याबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यामुळे ते जे काही बोलले त्याला फारसे महत्त्व देता येत नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक वेळा चर्चा झाली. त्यांच्या एकूण कृतीचा अंदाज आल्यावर पक्षप्रमुखांनी त्यांना विचारले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही आहोत. पक्षांतर करण्याचा विचारही मनात नसल्याचे त्यांनी सागितल्याचे संजय राऊत म्हणाले. याच वेळी एकनाथ शिंदे हे आमचे खूप जुने आणि प्रमुख नेत्यांपैकी एक होते. ते असे काही करतील असे असे आमच्यापैकी कोणालाच वाटले नव्हते, अशी खंतही संजय राऊत यांनी बोलून दाखवली.