'युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय' शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून 'असा' लगावला टोला
'युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय' असे म्हणत त्यांनी शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामध्ये सातत्याने सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप यामधून सुरू असलेला राजकीय फटकेबाजीचा सध्या सारी जनता बघत आहे. त्यामध्येच आज मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'क्रिकेटच्या भाषेत' बोलत पुन्हा महाविकास आघाडीवर टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडली नसल्याचं पहायला मिळालं आहे. लहानपणापासून क्रिकेट खेळायला आवडतं असं म्हणत त्यामध्येही बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. असं सांगताना आज फडणवीसांनी पुन्हा सत्ताधार्यांवर निशाणा साधला आहे. 'युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय' असे म्हणत त्यांनी शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
दरम्यान' मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंग, बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. आताही राजकारणाच्या मैदानात जोरदार बॅटिंग, बॉलिंग सुरू आहे. गुगली देखील टाकणार असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. सध्या समोरूनच इतके लूज बॉल येत आहेत की ते बॉर्डरच्या पार ठोकल्याशिवाय पर्याय नाही. मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील सरकार मधील नेत्यांच्या सद्यस्थितीवरही पुन्हा तोंडसुख घेतले आहे. Maharashtra: राज्यपालांकडे आमच्यासाठी वेळ नाही पण भाजपच्या फायद्यामध्ये व्यस्त, संजय राऊत यांची भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका.
काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्लांनी पोलिस अधिकार्यांच्या फोन टॅपिंग वरून दिलेला अहवाल आणि त्यावरून सत्ताधार्यांची करण्यात आलेली कोंडी यावरही आज प्रतिक्रिया देताना एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे पाहिलं पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणंच मूर्खपणाचं आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले. ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे.