Devendra Fadnavis on Union Budget 2021: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार कोटी, शिवसेनेला कोणताही शब्द दिला नव्हता- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीचा आधार घेत सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पात माहाराष्ट्राच्या वाट्याला ३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपये आले आहेत. राज्यातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रस्तेबांधणी आणि विकासासाठी एक लाख कोटी रुपयांपक्षाही अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

विधानससभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरुन (Union Budget 2021) विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काही लोकांनी अर्थसंकल्प न वाचताच टीका केली आहे, असा टोला फडणीस यांनी विरोधकांना लगावला. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत फडणवीस (Devendra Fadnavis on Union Budget 2021) यांनी आज (बुधवार, 10 फेब्रुवारी 2021) पत्रकार परिषदेत माहिती दिली. फडणवीस म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 3 लाख 5 हजार 611 कोटी रूपये आले आहेत. याशिवाय आरे कारशेडला 1832 कोटी रुपये मिळाले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी ओरड काहींनी केली. त्यानंतर मी स्वत: केंद्रीय अर्थसंकल्पाचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रावर खरोखरच अन्याय झाला आहे का? याची माहिती घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आज मी अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन बोलत आहे. अर्थंसंकल्पातील माहिती, आकडेवारी आपल्यासमोर मांडत आहे, असे देवेंद्र फडणीस म्हणाले. (हेही वाचा, Saamana Editorial on Budget: केंद्रीय अर्थसंकल्प 2021 म्हणजे डिजिटल घोड्यांवरून स्वप्नांची सैर; सामना च्या अग्रलेखातून टीका)

देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीचा आधार घेत सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पात माहाराष्ट्राच्या वाट्याला ३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपये आले आहेत. राज्यातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रस्तेबांधणी आणि विकासासाठी एक लाख कोटी रुपयांपक्षाही अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून राज्यात सुमारे 10 हजार किमी पेक्षाही अधिक रस्ते बांधले जाणार आहेत.

पढुे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या प्रकल्पासाठी 3 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून घरोघरी पाणी मिळावे यासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांची तरदूद आहे. शेतकीर सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी रुपयांची तरदूद आहे.

मुंबई मेट्रो कारशेडलाही केंद्रीय अर्थसंकल्पात 1832 रुपये प्राप्त झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटी रुपयांची तरदूद करण्यात आली आहे. या तरतूदीतील तबबल 7 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जे पैसे महाराष्ट्राला पाच वर्षात मिळायला हवे होते. त्यापेक्षाही अधिक पैसे महाराष्ट्राला मिळाले आहेत, हा आगोदरच्या सरकारमधील आणि मोदी सरकारमधील फरक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement