Devendra Fadnavis Death Threat: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आरोपीस सातारा येथून अटक

किंचक नवले (Kinchak Navale) असे या आरोपीचे नाव आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्याला सातारा (Satara) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले.

Devendra Fadnavis | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताला लागला आहे. किंचक नवले (Kinchak Navale) असे या आरोपीचे नाव आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्याला सातारा (Satara) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला कोर्टाने त्याला 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने उपमुख्यमंत्र्यांना धमकी देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात आली.

किंचक नवले याच्यावरील

किंचक नवले याच्यावर आरोप आहे की, त्याने सोशल मीडियाचा वापर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, सामाजीक तेढ निर्माण होऊ शकेल असे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल केले. आरोपीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजमन कलुशीत होईल, ज्यामुळे प्रक्षोभ निर्माण होईल, अशी भाषा असलेले व्हिडिओ व्हायरल केले. किंचक नवले याच्यावरील आरोपांतील तथ्य पोलीस तपासातच समोर येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, DCM Devendra Fadnavis Receives Death Threat: सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी, गुन्हा दाखल)

आरोपी वेशांतर करुन बदलायचा स्थान

पाठिमागील काही दिवसांपासून आरोपी किंचक नवले पोलिसांच्या रडारवर होता. मात्र, सातत्याने आपले स्थान बदलत असे तसेच, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सातत्याने वेशांतरही करत असे. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांना काहीसे अडचणीचे ठरत होते. दरम्यान, तो सातारा येथे असल्याचे समजताच सांताक्रूझ पोलीसांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. सातारा येथील सदर बाझार परिसरातून त्याला अटक करण्यात आली. (हेही वाचा, Manoj Jarang Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा 'बामणी कावा', हिंमत नसल्याने पोलिसांना पुढे करतात- मनोज जरांगे पाटील)

आरोपीस 7 मर्च पर्यंत पोलीस कोठडी

सांताक्रूझ पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जीवघेणी आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी सातारा येथील किंचक नवले नावाच्या 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

एक्स पोस्ट

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडिओ शेअर केले प्रकरणी योगेश सावंत नामक एका तरुणास पोलिसांनी या आधीच अटक केली आहे. योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्यालाही 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. योगश सावंत याला अटक केल्याचे प्रकरण राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गाजले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी 'होय, योगेश हा आमचा कार्यकर्ता आहे. त्याला राज्य सरकारने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे' विधिमंडळात म्हटले होते. किंचक आणि योगेश या दोघांनाही 'एक्स' हँडलवरुन आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याबद्दल कारवाईस सामोरे जावे लागत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif