Devendra Fadnavis हेच मुख्यमंत्री असतील: गिरीश बापट

या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

आज भारतीय जनता पक्षाची विधिमंडळ परिसरात एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नेता करायचा प्रस्ताव मांडला असता सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार अशा एकूण 12 आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

तसेच महाराष्ट्रातली सत्तास्थापनेचे समीकरण आठवडाभरात पूर्ण होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असा ठाम विश्वास असल्याचे मत खासदार गिरीश बापट यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या 5 वर्षात जे काम केलं त्यापेक्षा चांगलं काम पुढील 5 वर्षात करायचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे."

भाजप-शिवसेना महायुती ची 'ही' असू शकते संभावित मंत्र्यांची यादी; पाहा कोणाला मिळू शकतं कोणतं खातं?

तसेच महायुतीचंच सरकार पुढच्या 5 वर्षातही येईल असं ठाम मत मांडताना ते म्हणाले, "महायुती म्हणून आपण निवडणूक लढलो, जनतेने महायुतीला कौल दिला, राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कोणत्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. उत्तम सरकार पुन्हा स्थापन होईल."