भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी: डॉ. संजय लाखे पाटील

कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणात चौकशी आयोगाने उलट तपासणी करावी अशी मागणी केली आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Twitter)

कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणात चौकशी आयोगाने उलट तपासणी करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत असं आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय लाखे पाटील यांनी या आधीही अनेक याचिका दाखल केल्या आहेत. आणि त्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेत देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणात साक्षीदार म्हणून उलट तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यांनी याचिकेत म्हटले आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत मांडलेली भूमिका आणि पुणे पोलिसांचा तपासात समोर आलेले मुद्दे यात विसंगती असल्याचे दिसून आले आहे. आता त्यांच्या या याचिकेवर बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी विधानसभेतील एका निवेदनात देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, तसेच त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचे म्हटले होते.

उदयनराजे भोसले यांना खंडणी आणि मारहाण प्रकरणी मोठा दिलासा; सातारा सत्र न्यायालयाकडून 12 जण निर्दोष

आता मात्र संजय लाखे यांनी भीमा कोरेगाव, वडू आणि सणसवाडी या सर्व ठिकाणांचे फोन, मोबाईल रेकॉर्ड, पोलीस कंट्रोल रुमचे रेकॉडर्स, वायरलेस रेकॉर्ड या सर्व गोष्टी तपासण्याची मागणी केली आहे. फक्त देवेंद्र फडणवीसच नाहीत तर स्थानिक पोलिसांनी देखील दगडफेक आणि जाळपोळीमध्ये सहभाग घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.