IPL Auction 2025 Live

Bhandara Gondia Crime: भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकारणाचे विधानसभेत पडसाद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवेदन जारी

भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधान परिषदेत निवेदन जारी करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

गेल्या काही दिवसांपूर्वीच भंडारा-गोंदिया बलात्कार (Bhandara Gondia Crime) प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं होतं.मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर सलग दोनदा बलात्काराची (Rape) घटना  घडली होती. एवढचं नाही तर दोनदा झालेल्या सामूहिक बलात्कार हा दोन वेगवेगळ्या नराधमांच्या टोळी कडून घडल्याची धक्कादायक बाब पूढे आली होती. तरी या घटनेनंतर महिला खरचं सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला असताना आज या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) उमटल्याचे दिसले.  भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Deputy CM Devendra Fadnavis)  विधान परिषदेत निवेदन जारी करण्यात आले आहे. तरी संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी होवून संबंधीत गुन्हेगारास कठोर शिक्षा देण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

भंडारा-गोंदिया बलात्कार घटना अत्यंत गंभीर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. पोलिसांनी पिडीतेस बाहेर जाऊ द्यायला नको होतं असे फडणवीस म्हणाले. तसेच पोलिसांनी तिचा शोध घेणं गरजेचं होतं असेही फडणवीस म्हणाले. या प्रकरणी हलगर्जीपणे चौकशी करणाऱ्या बेजबाबदार पोलिसांना (Police) निलंबीत (Suspend) करण्यात आलं असल्याची माहिती देवेद्र फडणवीसांकडून देण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देत  उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन दिलं आहे. (हे ही वाचा:- Petition Against Aurangabad Osmanabad Renamed: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर निर्णयाविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी)

 

सध्या पिडीत महिलेची प्रकृती स्थिर आहे पण झालेल्या प्रकारमुळे तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे. संबंधीत घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर शिंदे फडणवीस सरकारची परखड भुमिका दिसून आली. तरी घडलेल्या प्रकारावर पिडीतेसह कुटुंबियांना न्यायाची प्रतिक्षा आहे. या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.