ऑनलाईन लॉटरी बंद होणार, यापुढे केवळ पेपर लॉटरी सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
राज्य मत्रिमंडळाची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच, निर्णयही घेण्यात आले.
राज्यात सुरु असलेली ऑनलाईन लॉटरी (Online Lottery) यापुढे बंद करण्यात येणार असून, केवळ पेपर लॉटरी (Paper Lottery) सुरु ठेवण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल (Revenue) चोरी केली जाते, अशा तक्रारी वारंवार आणि मोठ्या प्रमाणावर येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्यातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णायची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य सरकारशी संबंधीत असलेल्या कोणत्याही आर्थिक कामासाठी यापुढे संबंधीत व्यक्ती, संस्था आदींचा पॅन क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या महसूल विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऑनलाईन लॉटरी आणि राज्यातील महसुलचोरीला आळा घाल्याण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी राज्याच्या आर्थकारणात सखोल लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्याच्या महसूलवाढीच्या दृष्टीने आढावा घेतला जात आहे. (हेही वाचा, साप्ताहिक लॉटरी' 'चा निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर; इथे पहा विजेत्यांची यादी)
दरम्यान, ऑनलाईन लॉटरी बंद करण्याच्या निर्णयाचा राज्याला काही काळ फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यात हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावर लावण्यात येणारा करही रद्द केला जाणार आहे. आजघडीला राज्यात हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावर दोन प्रकारचे कर लावले जातात. त्याऐवजी मद्यनिर्मीतीवर लोवण्यात येणारा कर सरसकट वाढविण्यात येणार असून, त्याच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.