Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळ जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे- उपमुख्यमंत्री अजित पवार
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
निसर्ग चक्रिवादळ (Cyclone Nisarga) संकटाचा धोका ओळखून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटरद्वारे हे अवाहन केले आहे. पवार यांनी नागरिकांना अवाहन करताना म्हटले आहे की, अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. (हेही वाचा, Nisarga Cyclone: मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा आणि मोठ्या लाटांना सुरुवात (Watch Video))
आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची यंत्रणा संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तत्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध व सुरक्षित रहावं तसंच प्रशासनाच्या सुचनांचं पालन करावं, असंही अजित पवार यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2020 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

