Flights Cancelled At Pune Airport: दिल्लीतील दाट धुक्यामुळे हवाई प्रवास प्रभावित; पुणे विमानतळावर 9 उड्डाणे रद्द
दिल्लीहून येणारी अनेक उड्डाणेही उशीराने निघाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
Air Travel Impacted Due To Intense Delhi Fog: नवी दिल्लीत (New Delhi) दाट धुक्यामुळे हवाई प्रवास (Air Travel) प्रभावित होत आहे. धुक्यामुळे दृश्यमानता शून्यावर आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यासह दिल्लीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या 134 हून अधिक उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. विशेषत: दिल्लीतील धुक्यामुळे महाराष्ट्रातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवार, 28 डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर तब्बल नऊ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणारी चार उड्डाणे दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली. दिल्लीहून येणारी अनेक उड्डाणेही उशीराने निघाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले. पुण्याला हैदराबाद, गोवा, लखनौ आणि अमृतसरशी जोडणाऱ्या विमानतळांसह इतर विमानतळांवरही याचा परिणाम झाला आहे. (हेही वाचा -Ayodhya's New International Airport: अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार महर्षी वाल्मिकी यांचे नाव; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)
22 हून अधिक गाड्या विलंबाने -
दिल्लीतील धुक्यामुळे केवळ उड्डाणेच नाही तर 22 हून अधिक गाड्या उशीर धावणार आहेत. एका प्रवाशाने यासंदर्भात बोलताना सांगितले की, अनेक ट्रेन्स उशीराने धावत आहेत. काल रात्री ज्या 8 ट्रेन्स पोहोचायच्या होत्या त्या अजून आल्या नाहीत. आज सकाळी ज्या गाड्या पोहोचायच्या होत्या त्या जवळपास 3-3 उशिराने धावत आहेत. या गाड्या कधी येतील याची पुष्टी नाही.