Dengue Outbreak In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा फैला, 15 दिवस शाळांना सुट्टी
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या डोंगरगाव पंचक्रोशीमध्ये डेंग्यू आजाराचा (Dengue Outbreak फैलाव झाला आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने रुग्णालयांमधील गर्दीही वाढली आहे. परिणामी गावातील शाळा 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या डोंगरगाव पंचक्रोशीमध्ये डेंग्यू आजाराचा (Dengue Outbreak फैलाव झाला आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने रुग्णालयांमधील गर्दीही वाढली आहे. परिणामी गावातील शाळा 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. तसेच, धुम्रफवारणी आणि इतर उपाययोजनांवरही भर दिला आहे. एका बाजूला नागरिक आजारांचा सामना करत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशासन यंत्रणा मात्र त्याकडे गांभीर्याने पाहात नसल्याच्या तक्रारी आहेत. डोंगरगाव हे वेणी धरणाच्या पायथ्याशी वसलेले जवळपास 3,300 लोकवस्तीचे गाव आहे. गावातील स्थानिक राजकारणामुळे गावात खुर्चीचा खेळ सुरु आहे. परिणामी सरपंच शिवाजी हातमोडे यांनी अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला. लवकरच नवा सरपंच निवडला जाणार आहे. तोपर्यंत उपसरपंच असलेल्या सय्यद ऐसान यांच्याकडे पदाचा कारभार सोपविण्यात यावा यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. अशा स्थितीत गावातील आजाराचा फैलाव रोकायचा तरी कसा? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. गावत केळ डेग्यूच नव्हे तर मलेरिया आणि इतरही काही संसर्गजन्य आजारांची साथ आल्याचे दिसते.
डेंग्यू आटोक्यात येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा गावकऱ्यांचा निर्णय
दरम्यान, सुहाना शेख या केवळ 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू डेंग्यू आजारामुळे 4 ऑक्टोबर रोजी झाला. ती येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक वर्गाची विद्यार्थीनी होती. एका बाजूला गावातील राजकारणात सरपंच पदाची रिक्त असलेली खूर्ची त्यावरुन सुरु असलेला संगित खुर्चीचा खेळ. दुसऱ्या बाजूला वाढता आजाराच फैलाव. यातून मार्ग काढण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात यावी असा ठराव 5 ऑक्टोबर रोजी घेतला. या ठरावानुसार आजाराचा फैलाव आटोक्या येईपर्यंत (अंदाजे 20 ऑक्टोबर) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
एका आठवड्यात तीन नागरिकांचा डेंग्यू आजाराने मृत्यू
एकूण तालुक्याचा विचार करता, एक आठवड्यामध्ये डेंग्यू आजाराने तीन नागरिकांचा बळी घेतला आहे.यातील दोन डोंगरगावचे रहिवासीआहेत. तर दुसरा एक हिवरा संगम येथील आहे. नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमध्ये डोंगरगाव येथील सुहाना सय्यद इरफान या 10 वरप्षीय मुलीचाही समावेश आहे. रात्री 11.30 वाजणेच्या सुमारास 4 ऑक्टोबर रोजी या मुलीचा मृत्यू झाला. तर गावातीलच शेख शायान शेख वाजीद यांचाही डेंग्युनेत मृत्यू झाला आहे. हिवरा संगम येथील मृताचे नाव रितिक्षा ऊर्फ सुरेखा असे आहे.
डेंग्यू हा प्रामुख्याने डास चावल्याने होणारा आजार आहे. डास हे अस्वच्छतेमुळे होतात आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वच्छ पाण्यांवरच अंडी घालतात. डेंग्यू झालेल्या माणसाला अशक्तपणा, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधे दुकणे अशी प्राथमिक लक्षणे जाणवतात. खास करुन डेंग्यू झाल्यास रुग्णाच्या शरीरातील पेशींचे प्रमाण कमी होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)