Deglur-Biloli Assembly By-election: भाजपला आघाडी द्या, गाव जेवण देईन, चंद्रकात पाटील यांची ऑफर

ते नांदेड (Nanded) येथील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक (Deglur-Biloli Assembly By-election) पूर्वतयारीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपला आघाडी द्या तुम्हाला गावजेवण देईन' अशी ऑफरच पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

Chandrakant Patil | (Photo Credits: Facebook)

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीर सभेतून नागरिकांना दिलेल्या ऑफरची भलतीच चर्चा सुरु आहे. ते नांदेड (Nanded) येथील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक (Deglur-Biloli Assembly By-election) पूर्वतयारीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपला आघाडी द्या तुम्हाला गावजेवण देईन' अशी ऑफरच पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. या आधीही चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिका निवडुकीदरम्यान, असेच काहीसे विधान केले होते. सांगली येथे बोलताना ' महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन' असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

चंद्रकांत पाटील यांनी देगलूर-बिलोली येथील कार्यकर्त्यांना गावजेवणाची ऑफर देताना म्हटले की, भाजपला इथून आघाडी मिळाल्यावर केवळ गावजेवणच दिले जाणार नाही. तर मी स्वत: या ठिकाणी गावजेणात सहभागी होईल. चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफरचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा होतो हे निकालानंतरच कळणार आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने जोरदार ताकद लावली आहे. भाजपकडून नांदेडचे खासदार प्रताप पीटील चिखलीकर यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. तर रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांनी भाजप प्रचारासाठी देगलूरला हजेरी लावली आहे. (हेही वाचा, Maharashtra: आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील)

कोणकोणते उमेदवार रिंगणात

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी तिरंगी सामना रंगणार आहे. काँग्रेसने जितेश अंतापूरकर, भाजपने सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत. भाजपचे सुभाष साबणे हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले आहेत.