विश्वास नांगरे पाटील यांच्या हाती मुंबई सहआयुक्त पदाची सुत्रं; नाशिकचे आयुक्तपद दीपक पांडे यांच्याकडे सुपूर्त

मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे पाटील (Pjoto Credits: Facebook)

नाशिकचे (Nashik) पोलिस आयुक्त (Police Commissioner) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (Milind Bharambe) (गुन्हा) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नाशिकचे आयुक्तपद दीपक पांडे (Deepak Pande) यांच्याकडे सपुर्त करण्यात आले आहे. दरम्यान प्रताप दिघावकर यांची नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर तुरुंग महानिरीक्षक पदाची सुत्रं चेरिंग दोर्जे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस दलातील बदल्यांबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान आता बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये नवे पोलिस आयुक्त किंवा सहआयुक्त पदभार स्वीकारणार आहेत.

मनोजकुमार लोहिया हे आता कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील. तर पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम आणि ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळणकर यांची बदली करण्यात आलेली नाही. मात्र पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या आयुक्त पदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पोलिस दलातील बदल्यांवरुन चर्चा झाल्याचे समजतंय. त्यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्यातही या संदर्भात चर्चा झाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif