Maharashtra Floods 2019: पश्चिम महाराष्ट्रात पूराने घेतले 43 बळी; सलग 9 व्या दिवशी NDRF कडून बचावकार्य सुरू
पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात बळींची संख्या 43 वर पोहचली आहे. तर 3 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
मागील आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागात पावसाने घातलेल्या धुमाकुळानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात बळींची संख्या 43 वर पोहचली आहे. तर 3 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4,74,226 लोकांना विस्थापित केलं आहे. यामध्ये 584 गावांचा समावेश आहे. तर 596 तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. Konkan Rain: कोल्हापूर, सांगलीला सरकारने दिला मदतीचा हात, तर कोकणातील पूरस्थितीकडे सरकारने फिरविली पाठ, कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर
ANI Tweet
Maharashtra: Death toll due to flood in all five districts of Pune division (Sangli, Kolhapur, Satara, Pune, and Solapur) rises to 43. 3 still missing. 4,74,226 people have been evacuated from 584 villages. 596 temporary shelter camps have been set up for evacuated people. pic.twitter.com/JAB3vjR93g
— ANI (@ANI) August 13, 2019
कोल्हापूरात पाणी ओसरल्यानंतर आता वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. काल सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसेच लोकांसोबत प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कामं प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)