उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती कोरोनामुक्त झाल्या मागचे 'हे' कारण सांगत येथील नागरिकांचे केले कौतुक
गुरुवारी कोरोनामुक्त बारामती झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सर्व बारामतीकरांचे कौतुक करत महाराष्ट्रही लवकरच कोरोना मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात हैदोस घातलेल्या कोरोना व्हायरस विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचाच परिणाम महाराष्ट्रातील जिल्हे एक एक करत कोरोना मुक्त होत चालले आहेत. यात आता आणखी एका जिल्ह्याचे नाव समोर आले आहे ते म्हणजे 'बारामती' (Baramati). गुरुवारी कोरोनामुक्त बारामती झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सर्व बारामतीकरांचे कौतुक करत महाराष्ट्रही लवकरच कोरोना मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. 'कोरोनामुक्त बारामती'चं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
बारामतीत सर्व शासकीय तसेच वैद्यकीय यंत्रणेसह अनेक सामाजिक संस्थांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत हातभार लावला. त्यामुळे हा टप्पा गाठणे सोपे झाले. त्याचबरोबर तमाम बारामतीकरांनी 'लॉकडाऊन'चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एका क्लिकवर
भारतात कोरोना बाधितांनी 35000 चा टप्पा पार केला असून त्यापैकी 10000 हून अधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणित वाढत आहे. तर काही जिल्हे कोरोनामुक्त झाल्याचे सकारात्मक चित्र देखील समोर आहे. सध्या महाराष्ट्रात 10493 कोरोना बाधित रुग्ण असून 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1773 रुग्ण कोरोना संसर्गात पूर्णपणे रिकव्हर झाले असून 8266 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.
जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 33,08,323 वर पोहोचली असून 2,34,112 रुग्ण दगावल्याची माहिती Worldometers ने दिली आह