IPL Auction 2025 Live

'Daro Mat', Rahul Gandhi's video: 'डरो मत', राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील व्हिडिओ व्हायरल

कन्याकुमारी येथून निघालेली यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात नांदेड (Nanded) येथील एके ठिकाणी बोलतानाचा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ('Daro Mat', Rahul Gandhi's video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit- Bharat Jodo Yatra)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) करत आहेत. कन्याकुमारी येथून निघालेली यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात नांदेड (Nanded) येथील एके ठिकाणी बोलतानाचा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ('Daro Mat', Rahul Gandhi's video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते तरुणांना अतिशय महत्त्वाचा संदेश देताना दिसत आहेत. सशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे, अनेकांनी त्याला लाईक करुन प्रतिक्रियाही दिली आहे. भारत जोडो यात्रेला जसा पाठिंबा मिळत आहे त्याच प्रमाणे सोशल मीडियावरही राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आहे.

नांदेड येथे राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान, समोरच्या गर्दीतून त्यांना 'नांदेडच्या तरुणांना काय सांगाल?' असे कोणीतरी थेट विचारले. यावर राहुल गांधी यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितले 'घाबरु नका... आयुष्यात कोणालाच घाबरु नका. मी नरेंद्र मोदी किंवा आरएसएसबद्दल बोलत नाही. लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही कोणालाही घाबरला नाही तर तुमच्या मनात कोणाबद्दलही तिरस्कार निर्माण होत नाही. तिरस्कार निर्माण झाला नाही तर तुम्ही बंधुभाव सोडत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही घाबरु नका.' राहुल गांधी यांचा हा व्हिडि प्रचंड व्हायरल होतो आहे.

व्हिडिओ

नांदेड येथील सभेत राहुल गांधी म्हणाले, 'देशाची फाळणी करून तुम्ही तुमचे प्रेम दाखवू शकत नाही. एकीकडे तुम्ही राष्ट्रध्वजाला सलाम करता आणि दुसरीकडे भावांना आपसात भांडायला लावता - ही देशभक्ती नाही. यामुळे राष्ट्र कमकुवत होते, असे ते म्हणाले.

व्हिडिओ

दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने केलेली नोटबंदी आणि वस्तु सेवा कर (GST) आदि मुद्द्यांवरुनही केंद्रावर हल्ला चढवला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गांधी म्हणाले की, "भय आणि द्वेष पसरवण्याच्या" भाजपच्या धोरणांला विरोध करण्याच्या उद्देशानेच त्यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 8 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा जानेवारी 2023 मध्ये श्रीनगरमध्ये संपेल. तत्पूर्वी यात्रेने 3,750 किमी अंतर कापलेले असेल.