Dangerous Bridges in Mumbai: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर BMC ने जारी केली मुंबईमधील 13 धोकादायक पुलांची यादी; मिरवणुकीवेळी काळजी घेण्याचा इशारा

गणेशाच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, तसेच या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

Ganpati | Representational image (Photo Credits: pxhere)

Dangerous Bridges in Mumbai: महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) एक आठवडा अगोदर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने शुक्रवारी मुंबईतील 13 जुन्या आणि धोकादायक पुलांवर गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्याबाबत इशारा दिला. बीएमसीने पहिल्या दिवशी (7 सप्टेंबर) आणि त्यानंतर विसर्जनावेळी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि शेवटच्या दिवशीसाठी (17 सप्टेंबर) हा इशारा दिला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील या पुलांवर मिरवणूक काढताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे, त्यापैकी काहींची दुरुस्ती सुरू आहे.

पावसाळ्यानंतर इतर पुलांची दुरुस्ती केली जाईल, असे पालिकेने म्हटले आहे. मात्र, लोकांनी ओव्हरलोडिंग आणि कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, गणपती मिरवणुकीदरम्यान या पुलांवर नाचू नये तसेच एकाच वेळी गर्दी करू नये, असे सांगण्यात आले आहे.

धोकादायक जीर्ण पूल-

मध्य रेल्वेवरील सूचीबद्ध जीर्ण पुलांमध्ये घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड, आर्थर रोड, चिंचपोकळी, भायखळा आणि सायन स्टेशन यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक पुलांमध्ये, मरीन लाइन्स, सँडहर्स्ट रोड, फ्रेंच, केनेडी या पुलंचा समावेश होतो.

दादरमधील फॉकलँड, महालक्ष्मी आरओबी, प्रभादेवी आरओबी आणि एलटी रोड आरओबी हे इतर जीर्ण पूल आहेत. (हेही वाचा; Chinchpokali cha Chintamani 2024 First Look: चिंचपोकळीच्या चिंतामणी चा आगमन सोहळा सुरू; इथे पहा पहिली झलक)

दरम्यान, गणेशोत्सवाची लगबग आता सुरु झाली आहे आणि लवकरच वातावरणात चैतन्य, उत्साह पसरेल. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला आहे. अशात आज मुंबईतील खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आगमन सोहळा आज, 31 ऑगस्ट रोजी पार पडला. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif