दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच हजार शहाळ्याची आरास!

पुष्टीपती विनायकाच्या जयन्तीचा निमित्ताने पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात तब्बल ५००० शहाळ्यांमध्ये बाप्पांना विराजमान करण्यात आले आहे.

Photo Credits: Dagdusheth Ganpati

 पुणे : गणपतीच्या अवतारांपैकी पुष्टीपती विनायकाची जयंती ही वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी होते. या निमित्ताने आज पुणेकरांचे आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानातर्फे (Dagdusheth Halvai Ganpati Temple) मंदिरात पाच हजार शहाळ्यांची सजावट करण्यात आली आहे. वैशाखातील वाढत्या तापमानापासून सर्वांचे रक्षण व्हावे, महाराष्ट्रात पडलेलं दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत असे साकडे आज गणरायाच्या चरणी घालण्यात आले. एबीपीच्या वृत्तानुसार बाप्पांच्या मूर्तीच्या आसपास नारळाची प्रतीकात्मक झाडे आणि पाच हजार शहाळे ठेवण्यात आले होते, हे पाहण्यासाठी आज मंदिरात भाविकांची गर्दी जमली आहे.

१२६ वर्षांपूर्वी असा सुरू झाला श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणेशोत्सव

दरवर्षीच वैशाख शुद्ध पौर्णिमेला अशा प्रकारचा नैवैद्य श्रींच्या चरणी चढवला जातो. पुष्ट्पती विनायकाचा जन्म हा पहाटेच्या मुहूर्तावर झाला असल्याने सकाळीच मंदिरात या प्रकारची सजावट करण्यात आली होती. पुष्टीपती विनायकाच्या अवताराचा उल्लेख हा गणेशपुराणातील काही कथांमध्ये आढळून येतो.