Cyclone Mandous: 'चक्रीवादळ मंडस' महाराष्ट्रात ठरणार पावसाचे कारण, नागपूर, गोंदिया, अमरावती , वर्धा जिल्ह्यात 'Yellow Alert'
तामिळनाडूतीली महाबलीपूरम (Mahabalipuram) येथील आठवड्याच्या अखेरीस पावसाने हजेरी रावली. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरु आणि परिसरात हजेरी लावून आता या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही घोंगावताना दिसतो आहे.
चक्रीवादळ मंडस (Cyclone Mandous) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतीली महाबलीपूरम (Mahabalipuram) येथील आठवड्याच्या अखेरीस पावसाने हजेरी रावली. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरु आणि परिसरात हजेरी लावून आता या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही घोंगावताना दिसतो आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मंडस चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्यात होईल. त्यामुळे अनेक ठिकाणी अवकाळीसदृश्य स्थिती पाहायला मिळेल. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट ('Yellow Alert) जारी केला आहे.
हवामान विभागाकडून सोमवारी (12 डिसेंबर) महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, अमरावती आणि वर्धा विभागांसाठी 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्राततील तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूर प्रादेशिक हवामान कार्यालयाने 'साधारणपणे ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा' अंदाज वर्तवला आहे. यलो अलर्ट सूचित करतो की, संबंधित प्रदेशात सहा ते 11 सेमी दरम्यान पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानात घट
दरम्यान, महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी तापमानात घट पाहायला मिळाली. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्ताननुसार, मुंबईतील कुलाबा येथे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस होते तर औरंगाबादमध्ये 17.8 अंश, कोल्हापुरात 21.1 अंश, नाशिकमध्ये 19.2 अंश आणि रत्नागिरीत 24 अंश सेल्सिअस तापमान होते. (हेही वाचा, Mumbai Weather Report: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर टीकास्त्र; प्रदूषणाचे स्रोत शोधून कारवाईची मागणी)
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळल्यापासून मंडस चक्रीवादळाचा परिणाम काहीसा कमी झाला असला तरी, हवामान बदलाचे पडसाद दक्षिणेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किमान 15 डिसेंबरपर्यंत पाऊस पाडतील.
दरम्यान, मंडस चक्रीवादळामुळे पाठमागच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये (शनिवार, रविवार) तामिळनाडूमधील महाबलीपुरमजवळ भूकंप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. या पार्श्वभूमीवर कर्नाटकची राजधानी बंगळुरू (येथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला होता) आणि मध्य प्रदेश आणि आंध्रच्या काही भागांमध्ये पाऊस, ढगाळ आणि थंड हवामान पाहायला मिळाले.