Gold And I phone Seized On Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून 12.74 किलो सोनं कस्टम विभागाकडून जप्त, पाच जण अटकेत
मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने १२. ७३ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे
Gold Seized On Mumbai Airport: सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, मुंबई कस्टम विभागाची यंत्रणा कामाला लागली. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने 12. 74 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. ज्याची किंमत 8. 17 कोटी रुपये आहे सोबत 10 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केले आहे. कस्टम विभागाला माहिती मिळताच, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावरून पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे. (हेही वाचा- Bandipora मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात सुरक्षा दलाला यश; शस्त्रसाठा जप्त)
मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यातील पाच प्रकरणातून मुंबई कस्टम विभागाने 12.74 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. सोबत 10 लाखांपर्यंत नऊ आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केले आहे. आयफोन दुबईहून आणल्याचे उघड केले आहे. मुंबई कस्टम विभागाने एकूण पाच जणांना अटक केले आहे. प्रवाशांच्या जीन्सच्या खिशातून, ट्रोलीतून आणि अंर्तवस्त्रातून हे सोने जप्त केले आहे.
कस्टमच्या एअक इंटेलिजेंस युनिटने दुबईहून प्रवास करणाऱ्या चार भारतीय नागरिकांना अटक केले. त्यांच्याकडे अंडरगारमेटंमध्ये 3335 ग्रॅम सोने सापडले होते.म सोने अडवले. तर एकाने पाण्याच्या बाटलीमधून 2580.00 ग्रॅम सोन्याची पट्टी लपवून आणली होती. दुबईहून येताना एअर इंडियाच्या फ्लाइटच्या सीटच्या खाली लपवून ठेवलेले सोने कस्टम विभागाने जप्त केले. ते 1500.00 ग्रॅमचे होते.