Mumbai मध्ये 4 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान जमावबंदी लागू; मुंबई पोलिसांचे आदेश
Deputy Commissioner of Mumbai Police’s Mission Department Vishal Thakur यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारे एकत्र जमणं, मिरवणूका काढणं, मोठ्याने लाऊड स्पीकर लावणं यावर 2 जानेवारी पर्यंत बंदी असणार आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या आदेशानुसार आत मुंबई शहरामध्ये 4 डिसेंबर पासून 2 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकं एकत्र जमण्यास मज्जाव असणार आहे. शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हे जमावबंदीचे आदेश आहेत.
मुंबई शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाई आहे. 4 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत मुंबईत अनेक भागांमध्ये शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे. असे टाईम्स नाऊ च्या वृत्तामध्ये नमूद केले आहे.
Deputy Commissioner of Mumbai Police’s Mission Department Vishal Thakur यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारे एकत्र जमणं, मिरवणूका काढणं, मोठ्याने लाऊड स्पीकर लावणं यावर 2 जानेवारी पर्यंत बंदी असणार आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबर दिवशी VIP Movement; पहा कोणत्या मार्गावर वाहतूक संथ राहण्याची ट्राफिक विभागाने दिली माहिती .
नेमकी कशावर असेल बंदी?
- पब्लिक एंटरटेन्मेंटच्या जागी मोठ्या प्रमाणात गर्दी
- बॅन्ड, लाऊडस्पीकर मोठ्याने लावणं, फटाके फोडणं
- सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, गाणी गाणं
- लग्नाच्या मिरवणूका, अंत्यविधी, कोऑपरेटिव्ह सोसायटीची मिटिंग, मोठ्या प्रमाणात लोकांचं एकत्र जमणं यावर निर्बंध असणार आहेत.
- सरकारी, निमसरकारी कार्यालयाबाहेर 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचं जमणं यावर निर्बंध असतील.
- बंदुक, तलवारी आणि इतर अशा शस्त्रांना परवानगी नाही. 4 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू राहतील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.