CSMT-Shirdi Vande Bharat चा वेग 130 Kmph पर्यंत वाढवणार - मध्य रेल्वे
CSMT-Shirdi ही ट्रेन आता 130 kmph वेगाने इगतपुरी-मनमाड मार्गावर धावणार असल्याचं मध्ये रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
वंदे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Train) निमित्ताने प्रवाशांना ट्रेन मध्येच विमानाप्रमाणे सोयी-सुविधा मिळत असल्याने त्याने प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे. अशा मध्ये आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-शिर्डी (CSMT-Shirdi) दरम्यान धावणार्या वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आता 130 kmph वेगाने इगतपुरी-मनमाड मार्गावर धावणार असल्याचं मध्ये रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
वंदे भारत ट्रेनची क्षमता 160 kmph आहे परंतू त्या क्षमतेचे रेल्वे रूळ उपलब्ध नसल्याने ही ट्रेन पूर्ण क्षमतेने धावू शकत नाही. सध्या इगतपुरी ते शिर्डी या 125 किमी अंतरावर ट्रेनचा वेग 110 kmph ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, हा वेग वाढवण्यासाठी CR ने ट्रॅक सुधारणा सुरू केल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पूर्ण झाल्यावर, ही ट्रेन प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी कमी करेल. याचा फायदा इगतपुरी-भुसावळ मार्गावरील इतर गाड्यांनाही होईल, ज्यामुळे या मार्गावरील प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होईल अशी आशा आहे.
काही दिवसांपूर्वीच सीएसएमटी -शिर्डी या वंदे भारत ट्रेनसाठी ठाणे प्रमाणेच आता कल्याण मध्येही थांबा देण्यात आला आहे. सध्या ही ट्रेन सकाळी 6.15 ला सीएसएमटी स्थानकातून सुटते आणि दुपारी 12.10 वाजता शिर्डीला पोहचते तर संध्याकाळी 5.25 ला शिर्डी साईनगर स्थानकातून सुटणारी ट्रेन रात्री सीएसटीएम स्थानकात 11.18 ला पोहचते.