मुंबई: सीएसएमटी येथे घडलेल्या पुल दुर्घटनेत जखमी झालेल्या 57 वर्षाच्या वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील सीएसएमटी (CSMT) येथे 14 मार्च रोजी संध्याकाळच्या रहदारीच्या वेळी रेल्वेस्थानकाबाहेरील पादचारी पुल कोसळून दुर्घटना घडली होती

Mumbai CSMT footover bridge Accident | (Photo Credits: ANI)

मुंबईतील सीएसएमटी (CSMT) येथे 14 मार्च रोजी संध्याकाळच्या रहदारीच्या वेळी रेल्वेस्थानकाबाहेरील पादचारी पुल कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 60 टक्के पूलाचा भाग कोसळून पडल्याने त्यामध्ये 36 जण जखमी आणि 6 जणांचा मृत्यू झाला होता.

या प्रकारानंतर प्रशासनाला जागी आली असून सध्या महापालिकेने पादचारी पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र या दुर्घटनेत सापडलेल्या एका 57 वर्षाच्या वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला असून आता मृत व्यक्तींचा आकडा 7 वर जाऊन पोहचला आहे.(हेही वाचा-CSMT Bridge Collapse: पूल दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन राजकीय पक्षापासून ते बॉलिवूड कलाकारांनी याबद्दल दुख व्यक्त केले होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी सहाय्यक अभियंतांना अटक करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेचे अभियंता अनिल पाटील यांनासुद्धा अटक करण्यात आली होती.