सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: मुख्य अभियंत्यासह सहाय्यक अभियंता निलंबीत; संबंधीत कंपनीस कारणे दाखवा नोटीस

तर, मख्य अभियंता एस. ओ. कोरी उपमुख्य अभियंता यांनाही निलंबीत करण्यात आले आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झाल्याचे समजते. दोषी असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे.

Mumbai CSMT footover bridge Accident | (Photo Credits: ANI)

CSMT Bridge Collapse: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नजीक असलेल्या दादाभाई नौरौजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल (Himalaya Pedestrian Pool) गुरुवारी (14 मार्च) कोसळला. या दुर्घटनेत 6 जण ठार तर, 30 जन जखमी झाले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत मुख्य अभियंता ए. आर पाटील (A R Patil) आणि सहाय्यक अभियंता एस एफ काकुळते (S F Kakulte) यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर, या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आरपीएस कंपनीला (RPS Company)कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुलाबाबत चुकीचा अहवाल देणाऱ्या सल्लागार कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तर, मख्य अभियंता एस. ओ. कोरी उपमुख्य अभियंता यांनाही निलंबीत करण्यात आले आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झाल्याचे समजते. दोषी असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे.

पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर पालिका प्रशासनाने तोंडदेखली कारवाई केल्याचे दिसते आहे. त्यामुळे छोटे मासे चौकशीच्या जाळ्यात अडकवून मोठे मासे मात्र मोकाट सोडल्याचा आरोप मुंबईकर नागरिक करत आहेत. या दुर्घटने प्रकरणी मुंबई आयुक्त अजॉय मेहता यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जात प्रतिक्रिया देणे अपेक्षीत होते. मात्र, तेही जनतेप्रती असलेली बांधीलकी दाखवत आतापर्यंत समोर आले नाहीत. (हेही वाचा, CSMT Bridge Collapse: पूल दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

दरम्यान,  पालिकेत आणि राज्याच्या सत्तेत असलेले राजकीय पक्षही दुर्घटनेशी आपला काहीच संबंध नसल्याचे दाखवत निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.