Nagpur Shocker : हेडफोन घालून रेल्वेरुळ ओलांडने बेतले जीवावर; नागरपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू

मोबाइलचे अति व्यसन नागपूरमध्ये एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना एका 15 वर्षीय मुलाचा अपघात मृत्यू झाला.

Nagpur Shocker : हेडफोन घालून रेल्वेरुळ ओलांडने बेतले जीवावर; नागरपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू
Representational Image (File Photo)

Nagpur Shocker : नागपूर जिल्ह्यातील रामटेक (Ramtek) तालुक्यात रेल्वे अपघातात(Accident) एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलगा कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत होता. रुळ ओलांडत असतांना मालगाडीचा आवाज न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रामटेक तालुक्यातील मनसर येथे शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आर्यन केकटे असं मृत नुलाचे नाव आहे.

आर्यन केकटे हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे जाण्यासाठी घरून सायकलवरून निघाला होता. दरम्यान, वाटेत रेल्वे रुळ ओलंडावे लागत असल्याने तो सायकलवरून उतरून पायी रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे लाईनच्या पलीकडे त्याचे शेत होते. यावेळी त्याच्या कानात हेडफोन असल्याने त्याला इतर कुठलाही आवाज ऐकायला आला नाही. किंबहुना मोबाईलच्या नादात माघून रेल्वे गाडी येत असल्याचा साधा अंदाज देखील त्याला आला नाही.

दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना त्याला रामटेकहून इतवारीकडे जाणाऱ्या मालगाडीने जबर धडक दिली. रेल्वेच्या धडकेनंतर तो काही अंतरावर रुळांवर ओढला गेला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आर्यनच्या हातात मोबाईल आणि कानात हेडफोन होते, त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडतांना मालगाडी येत असल्याचे त्याला कळले नाही. त्याला मालगाडीचा हॉर्नही ऐकू आला नसावा. त्यामुळे तो या अपघाताचा बळी ठरला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2024 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).