ठाणे: डान्सबारमध्ये काम करणाऱ्या पत्नीची हत्या, पिंप ठरला साक्षीदार; गुन्हेगार पतीला बेड्या
हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मृत महिलेचा पती हमीद अन्साही हाच होता. पोलिसांनी हमीद अन्सारी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हमीद अन्सारी याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, हे कृत्य का केले हेदेखील सांगितले.
डान्सबारमध्ये (Dance Bar) काम करणे न आवडल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना भिवंडी (Bhiwandi) येथे घडली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी (Thane Rural Police) या प्रकरणात मृत महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. सबिना सरदार (Sabina Sardar) असे मृत महिलेचे (पत्नी) तर, हमीद अन्सारी (Hameed Ansari) असे गुन्हेगार पतीचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास करताना पिंप (Barrel) मुख्य साक्षिदार ठरला. कारण, या पिंपाच्या सहाय्यानेच पोलिसांना हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे उलघडत गले.
प्राप्त माहतीनुसार, सबिना सरदार आणि हमीद अन्साही हे दोघे विवाहीत पती-पत्नी होते. नारपोली येथे दोघेही एकत्र राहात असत. दरम्यान चरितार्थ चालविण्यासाठी सबिना हिने डान्सबार हे क्षेत्र निवडले होते. गेले बराच काळ ती डान्सबारमध्ये काम करत होती. मात्र, आपली पत्नी डान्सबारमध्ये काम करते हे पती हमीद अन्सारी याला खटकत असे. डान्सबारमध्ये काम करण्यावरुन पती हमीद अन्सारी याचे पत्नी सबिना सरदार हिच्याशी नेहमीच खटके उडत असत.
दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिसांना खबर लागली की, सोनाले गावानजीक एका निर्जन स्थळी एक बेवारस पिंप पडला आहे. तसेच, या पिंपात महिलेचा मृतदेह आहे. ठाणे ग्रामीण पोलीस घटनास्थळी गेले असता मिळालेली खबर पक्की असल्याची खात्री झाली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला त्यावेळी पिंपातील मृतदेहाचे आठ तुकडे केल्याचे समोर आले. एकूण स्थिती पाहता महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, ही महिला नेमकी कोण हे शोधायचे कसे? हा मोठाच सवाल पोलिसांसमोर होता. मृतदेहाची ओळख आणि खुनाचा तपास करण्यासाठी पोलीसांची विचारचक्रे जोराने फिरत होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ठरवले की, हत्या प्रकरणात वापरण्यात आलेला हा पिंप नेमका कुठूण आला याबाबत पहिल्यांदा शोध घ्यायचा. पोलिसांनी त्या दिशेने शोध सुरु करताच हा पिंप तारापूर येथील कंपनीत तयार करण्यात आला असून, त्याची विक्री भिवंडी येथे करण्यात आल्याचे समोर आले. (हेही वाचा, पुणे: तरुणावर अॅसिड हल्ला,आरोपीने गोळ्या झाडून केली आत्महत्या)
पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवला असता तारापूर येथील कंपनीत तयार करण्यात आलेल्या या पिंपाचा प्रवास भिवंडी येथून भिवंडी येथीलच एका गोदामात आल्याचे समजले. पोलिसांनी तपास सुरुच ठेवला होता. पुढे हा पिंप भंगारच्या दुकानात विकण्यात आला होता. पोलिसांनी संबंधीत भंगार विक्रेत्याला शोधून काढले असता त्याने हा पिंप एका व्यक्तिने विकत घेतल्याचे सांगितले.
भंगार विक्रेत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा पिंप विकत घेणाऱ्या व्यक्तिची ओळख पटली. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मृत महिलेचा पती हमीद अन्साही हाच होता. पोलिसांनी हमीद अन्सारी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हमीद अन्सारी याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, हे कृत्य का केले हेदेखील सांगितले.