Cricket Bookie Fraud: गोंदीया येथे व्यावसायिकाची 58 कोटींची फसवणूक

पोलिसांनी आरोपीच्या घरातून सोने, चांदी असा ऐवज जप्त केला आहे. आरोपी फरार आहे.

Cricket Bookie Fraud | (Photo Credit - Twitter/ANI)

Gondia News Today: नागपुरातील एका व्यावसायिकाने ऑनलाइन जुगारात तब्बल 58 कोटी रुपये गमावल्याचे वृत्त आहे. अनंत जैन उर्फ शोंटू नामक आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी विरोधात या प्रकरणी गुन्हा (Cricket Bookie Fraud) दाखल झाला आहे. आरोपीने व्यावासायिकास भरघोस परदावा देण्याच्या उद्देशाने मोबाइल अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. आरोपी जैन याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी गोंदियात पोहोचले. मात्र आरोपीने तत्पूर्वीच दुबईला पलायन केले होते. तो चौरट्या मार्गाने दुबईला गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी नागपूरपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरातील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. छाप्यामध्ये 17 कोटींहून अधिक रोख रक्कम, सुमारे 14 किलो वजनाचे सोने आणि 200 किलो चांदी असा ऐवज सापडला. जो पोलिसांनी जप्त केला.

प्राप्त माहितीनुसार, जैन यांने तक्रारदाराला व्यापारी- नफा कमावण्यासाठी एक फायदेशीर मार्ग म्हणून ऑनलाइन जुगाराचे महत्त्व पटवून दिले होते. सुरुवातीला संकोच आणि संशय वाटल्याने व्यावसायिकाने जैन याच्या सांगण्यावरुन घाबरत घाबरतच 8 लाख रुपये हस्तांतरित केले. त्यात किरकोळ नफा झाल्यावर पुढची गुंतवणूक करण्यात आली, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. (हेही वाचा, Pig Attack on Child Video: लहान मुलावर डुकराचा हल्ला, गोंदिया येथील घटान (पाहा व्हिडिओ))

ट्विट

जैन यांने व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक दिली. व्यावसायिकाच्या खात्यात 8 लाख रुपये जमा झाल्याचे आढळले आणि तो जुगार खेळू लागला, असे कुमार म्हणाले. सुरुवातीच्या यशानंतर, व्यावसायिकाचे नशिबात पालटले. त्याने सुरुवातीला सुमारे 5 कोटी रुपये जिंकले. पण तब्बल 58 कोटी रुपये गमावले, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, व्यापारी तोट्यात असल्याने त्याला संशय आला आणि त्याने पैसे परत मागितले, पण आरोपीने त्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकरत्याने पोलिसांत धाव घेतली.