COVID Tests Rates In Maharashtra: राज्यात कोविड चाचण्यांच्या दरांमध्ये पुन्हा कपात; जाणून घ्या रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज, RT PCR Test चे नवे दर

ही टेस्टींग मोफत आहे.

Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Pandemic मागील वर्षभरापासून भारतासह जगात धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने मागील दीड महिन्यापासून पुन्हा कोरोना रूग्णांचा कहर सुरू झाला आहे. यामध्ये आता राज्यात डबल म्युटंट कोरोना वायरस पसरत असल्याने केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन टाळून जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी 'टेस्टींग' वर भर देण्याचा प्रशासनाचा, आरोग्य यंत्रणांचा सल्ला आहे. म्हणून अधिकाधिक लोकांनी कोविड 19 टेस्टिंगमध्ये सहभाग घेत आता वेळीच संसर्ग आणि आजार ओळखल्यास संक्रमण आटोक्यात ठेवण्यात मदत होणार आहे. सध्या राज्यात मिशन टेस्टिंग सुरू आहे. नागरिकांनी महागड्या दरामुळे टेस्टिंगपासून दूर राहू नये याकरिता महाराष्ट्रात RT PCR सोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज टेस्टिंगचे दर देखील कमी केले आहेत. RT-PCR, Antigen, Antibody Test: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्‍या विविध COVID Tests टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात आरटीपीसीआर चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये केवळ 500 रूपये मोजावे लागणार आहेत. रुग्णाच्या घरातून नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रूपयांपेक्षा अधिक किंमत आकारता येणार नाही असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड 19 निदानासाठी आरटी पीसीआर अंतिम आणि खात्री लायक टेस्ट मानली जात आहे.

दरम्यान आरटी पीसीआर सोबत अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आकारले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

मुंबई मध्ये पालिकेच्या मिशन टेस्टिंगमध्ये रेल्वे स्थानक, बस स्टॉप, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी कुठेही अचानक पालिका कर्मचारी नागरिकांची टेस्ट करत आहेत. ही टेस्टींग मोफत आहे तर मॉल मध्ये प्रवेशापूर्वी आरटी पीसीआर टेस्ट करणं बंधनकारक आहे ज्याचे पैसे नागरिकांना मोजावे लागणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif