COVID 19 Vaccine: भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज मध्ये Covisheild लसीचा पहिला मानवी प्रयोग, पाच जणांंना दिला डोस- डॉ. विश्वजीत कदम

पुणे (Pune) येथे स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये (Bharti Vidyapeeth Medical College) आज पाच स्वयंसेवकांना सीरम इंंस्टिट्युट (Serum Institute) ने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ (Covisheild) लसीचा डोस देण्यात आला.

Coronavirus (Photo Credits: ANI)

पुणे (Pune)  येथे स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये (Bharti Vidyapeeth Medical College)  आज पाच स्वयंसेवकांना सीरम इंंस्टिट्युट (Serum Institute) ने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ (Covisheild) लसीचा डोस देण्यात आला. या स्वयंसेवकांना 0.5  एमएलचा डोस देण्यात आला असुन आता त्याचा परिणाम तपासण्यासाठी पुढील दोन महिने त्यांंना निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मंंत्री डॉ.विश्वजीत कदम (Dr. Vishwajeet Kadam) यांंनी दिली आहे.पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने ब्रिटीश-स्वीडीश औषध कंपनी अस्त्राझेनेका सोबत देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार केला आहे. आज त्यासाठीची पहिली मानवी चाचणी पार पडली. COVID 19 Vaccine: Covisheild या कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी असली तरी विक्रीबाबत अद्याप निर्णय नाही- Serum Instititute

या लसीसाठी चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली होती. मंगळवारी या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरुष आणि महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचे आरटी- पीसीआर आणि अँटीबॉडी चाचणी अहवाल अनुकूल आल्यावर आज त्यांना लसीचा डोस देण्यात आला.

ANI ट्विट

दरम्यान भारतात एकूण 17 वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर हॉस्पिटल मध्ये सुद्धा या चाचण्या होतील. केंद्र सरकारतर्फे सीरम इंंस्टीट्युट ला उत्पादन करुन पुढील वापरासाठी तयार राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप लसीच्या विक्रीबाबत काहीही निर्णय झालेला नाही.