Covid 19 Vaccination In Maharashtra: महाराष्ट्राने पार केला दीड कोटी लसीकरणाचा टप्पा; इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे पहिले राज्य
महाराष्ट्राने (Maharashtra) राज्यात दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. इतक्या विक्रमी संख्येमध्ये लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. काल (26 एप्रिल) महाराष्ट्रात एका दिवसांत सर्वाधिक 5 लाख डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवस कोरोना रूग्णसंख्येमध्ये होत असलेली विस्फोटक वाढ चिंतेची बाब असली तरी आता हळूहळू रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. यासोबतीने कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना प्रशासनाकडून कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा (COVID 19 Vaccination) देखील वेग वाढवण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राने (Maharashtra) राज्यात दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. इतक्या विक्रमी संख्येमध्ये लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. काल (26 एप्रिल) महाराष्ट्रात एका दिवसांत सर्वाधिक 5 लाख डोस देण्यात आले आहेत. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याची माहिती देताना आरोग्य यंत्रणेचे देखील आभार मानले आहेत.
दरम्यान आता 1 मे पासून 18 वर्षावरील सार्यांचेच सरसकट लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी लसींचा साठा, लसीकरण केंद्रावर विशेष सोय याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. अद्याप हे लसीकरण महाराष्ट्रात मोफत उपलब्ध केले जाईल की नाही याची माहिती देण्यात आलेली नाही. पण काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतची माहिती देताना मंत्रिमंडळात त्याचा निर्णय घेतला जाईल आणि मुख्यमंत्री तो निर्णय सांगतील असे म्हणाले आहेत. COVID 19 Vaccine Global Tender काढण्याची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात- राजेश टोपे.
राजेश टोपे ट्वीट
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे.#MahaVaccination
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 27, 2021
सध्या भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस उपलब्ध असून 1 मे पासून स्फुटनिक वी लसीला देखील उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सध्या केंद्र आणि राज्य पातळीवरून सुरू आहेत. केंद्र सरकराच्या आदेशांनुसार आता लसीकरणासाठी राज्य सरकार थेट लस उत्पादक कंपन्यांसोबत बोलून लस विकत घेऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात आता तिसर्या टप्प्यातील लसीकरण कसं आणि किती वेगवान होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2021 01:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

