BMC: मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू, पब आणि हॉटेल राहणार बंद; केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) येथील कोरोना (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता शहरातील निर्बंध आणखी कठोर करण्याची शक्यता आहे.
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) येथील कोरोना (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता शहरातील निर्बंध आणखी कठोर केली जाऊ शकतात. याचपार्श्वभूमीवर मुंबईत 28 मार्चला रात्री 10 किंवा 11 वाजता नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू केला शकतो, असे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या आहेत. नाईट कर्फ्यू दरम्यान पब आणि हॉटेल बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. महत्वाचे म्हणजे, झोपडपट्टी आणि चाळींच्या तुलनेत बहुमजली इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण अधिक सापडत आहेत. यामुळे 4 किंवा 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येऊ शकते, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
मुंबईत अटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुबंईत गेल्या काही आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत शुक्रावारी तब्बल 5 हजार 513 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in India: महाराष्ट्रासह 'या' 6 राज्यात कोरोना विषाणूच्या 80 टक्के प्रकरणांची नोंद; जाणून घ्या देशातील स्थिती
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता 28 मार्चपासून संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. राज्यात काल (शुक्रवारी) तब्बल 36 हजार 902 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 112 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 26 लाख 37 हजार 735 वर पोहचली आहे. यातील 23 लाख 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 82 हजार 451 रुग्ण सक्रीय आहेत.