CM Uddhav Thackeray On Lockdown: काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, एक-दोन दिवसांत निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई येथील घाटकोपर परिसरात असलेल्या जेजे हॉस्पीटल येथे हे लसीकरण पार पडले. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि रश्मी ठाकरे यांच्या मातोश्री पाटणक यांनीही कोरोना लस घेतली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज कोरोना लस ( Corona Vaccination) घेतली. या वेळी कोरोना लस घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगतानाच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जबादारी घेणेही किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. यासोबतच जर गरज पडल्यास आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याचा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवॅक्सीन ही लस घेतली. मुंबई येथील घाटकोपर परिसरात असलेल्या जेजे हॉस्पीटल येथे हे लसीकरण पार पडले. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि रश्मी ठाकरे यांच्या मातोश्री पाटणक यांनीही कोरोना लस घेतली. या वेळी राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने उपस्थित होते. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray यांनी मुंबई त J J Hospital मध्ये घेतला Covaxin Vaccine चा पहिला डोस)

कोरोना लसीबाबतचा अनुभव सांगताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना लसीबाबत कोणीही कोणतीही भीती, संभ्रम बाळगू नये. लस घेत असताना कळत देथील नाही. त्यामुळे लसीकरणासाठी जे जे पात्र असतील अशा सर्वांनी लस घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाढत्या कोरोना संक्रमनाबाबत गांभीर्याने उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांनी लसीकरुन घ्या. अनावश्यक ठिकाणी आणि अनावश्यक पद्धतीने गर्दी टाळा. हात धुने कायम ठेवा. तसेच सर्वाजनिक ठिकाणी जाताना आणि घराबाहेर पडताना मास्कचा वापर कराच. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.