Coronavirus: मिरारोड-भायंदर येथील हॉटस्पॉट ठिकाणांवर येत्या 31 मार्च पर्यंत कोरोनाचे निर्बंध लागू

त्यामध्ये रेस्टॉरंट, बार, बॅंक्वेट्स आणि दुकानांचा समावेश असून त्यांना 31 मार्च पर्यंत नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Coronavirus in India | representational Image | (Photo Credits: IANS)

राज्यासह मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे विविध ठिकाणी संचारबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दिवसात लॉकडाऊन जाहीर करायचा की नाही त्या संदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत. आता मिरारोड भाईंदर मध्ये कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 31 मार्च पर्यंत काही गोष्टींबर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये रेस्टॉरंट, बार, बॅंक्वेट्स आणि दुकानांचा समावेश असून त्यांना 31 मार्च पर्यंत नियमांचे पालन करावे लागणार आहे.(Lockdown In Nagpur: नागपूर मध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दारुच्या दुकानात नागरिकांची धाव, गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा उडाला फज्जा)

मिरारोड येथे कोरोनाचे सात हॉटस्पॉट ठरले असून भायंदर येथे रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट्स आणि बँक्वेट्सने रात्री 1 ऐवजी ते रात्री 11 वाजताच बंद करणे अनिवार्य असणार आहे. तर दुकानांना 10 वाजता बंद करण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.(Coronavirus: मिरारोड-भायंदर येथील हॉटस्पॉट ठिकाणांवर येत्या 31 मार्च पर्यंत कोरोनाचे निर्बंध लागू)

बहुतांश रहिवाशी कॉलनी याच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्या आहेत. मिरा रोडमधील पुनम सारग कॉम्पेक्स, भायंदर पश्चिमेकडील सादना नगर, हॉटेल साईलीला हे काही कन्टेंन्मेंट झोन आहेत. तर कंन्टेन्मेंट झोन वगळून अन्य परिसरातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, फुड कोर्ट्सना नियमांनुसार सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तसेच दुकाने सुद्धा सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत.या ठिकाणी शुक्रवारी पर्यंत कोरोनाच्या 27,797 रुग्णांची नोंद झाली आहे. अॅक्टिव रुग्णांचा आकडा 792 असून भायंदर पश्चिमेपेक्षा मिरा रोड येथीलच कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिक आहे.