Mumbai: 22 मार्चपासून मॉल्सला भेट देण्यासाठी कोविड - 19 नकारात्मक अहवाल अनिवार्य - BMC

संबंधित व्यक्तीकडे नकारात्मक अहवाल नसल्यास त्यांना शॉपिंग सेंटरमध्येचं आपली अँन्टीजेन चाचणी करावी लागेल.

BMC | (Photo Credits: Facebook)

Mumbai: महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना राज्य सरकारने लोकांच्या हालचालीवर कडक निर्बंध लादले आहेत. कोविड प्रकरणातील वाढ रोखण्याच्या ताज्या हालचालीत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल अनिवार्य केला आहे. दरम्यान, 22 मार्चपासून नागरिकांना मुंबईतील कोणत्याही मॉलला भेट द्यायची असल्यास त्यांना आपला कोरोना नकारात्मक असल्याचा अहवाल दाखवावा लागणार आहे. संबंधित व्यक्तीकडे नकारात्मक अहवाल नसल्यास त्यांना शॉपिंग सेंटरमध्येचं आपली अँन्टीजेन चाचणी करावी लागेल. यासाठी मुंबईतील सर्व मॉल्समध्ये लवकरचं रॅपिड अँटीजेन चाचणीची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. याच उद्देशाने मॉल्सच्या प्रवेशद्वाराजवळ एक पथक नेमण्यात येईल, असंही बीएमसीने सांगितलं आहे. (वाचा - कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; लसीकरणासंदर्भात दिले 'हे' निर्देश)

राज्यात गुरुवारी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. त्यामुळे आता संस्थात्मक विलगीकरणावर भर देतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट हे तीन प्रिन्सिपल प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागाला दिले आहेत. राज्यात गुरुवारी 25833 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच नवीन 12764 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2175565 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,66,353 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.79% झाले आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी 2877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय 1193 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या मुंबईमध्ये 18,424 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने दादर भाजीपाला मार्केट आणि फुलांच्या बाजार तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर भाजीपाला मार्केटमध्ये नागरिक दररोज प्रचंड गर्दी करत आहेत. मास्क न वापरता तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत लोक कोरोना नियमावली पायदशी तुडवत आहेत. त्यामुळे मार्केट तात्पुरते सायन किंवा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील सोमय्या मैदानावर हलवले जाऊ शकते. या विषयावर अंतिम निर्णय महापौर किशोरी पेडणेकर मार्केट असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर घेणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif